एक्स्प्लोर

NMC Elections 2022 : शुक्रवारी आरक्षण लॉटरी, ओबीसी, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत

ओबीसी आरक्षण जाहीर करतानाच निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणूकांची घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ओबीसी आरक्षण सोडत तातडीने उरकून पुढील निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पाऊल उचलले आहे.

नागपूरः सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर नव्याने आरक्षण सोडतची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 जुलै रोजी महाल येथील नगरभवनात ही आरक्षण सोडत निघेल. राज्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली. या आरक्षण सोडतीला मोठे महत्त्व असून 52 प्रभागांपैकी 30 प्रभागासाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागेल. यासाठी राजकीय समीकरण बदलणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा टिकून आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण जाहीर करतानाच निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूकांची घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ओबीसी आरक्षण सोडत तातडीने उरकून पुढील निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पाऊल उचलले आहे.

30 प्रभागात बदतील समीकरणे

महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या 56 जागांमधून ओबीसी महिला व सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा ठरतील. सध्या 22 प्रभागात महिलांसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित आहे. त्यामुळे 52 प्रभागातील उर्वरित 30 प्रभागांसाठी पुन्हा लॉटरी काढण्यात येईल. हेच 30  प्रभाग राजकीय समीकरण बदलण्यास कारणीभूत ठरतील. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. ओबीसी आरक्षण ठरल्यानंतर या जागांवर सर्वसाधारण वर्गाची दावेदारी संपुष्टात येईल.

हरकती, सूचनांसाठी चार दिवस

आरक्षण सोडत आणि मतदार यादी जाहीर झाली की त्यावर हरकती व सूचनांसाटी किमान 10 ते 15 दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र, न्यायालय व निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मनपाने निवडणूक कार्यक्रमासाठी वेगाने प्रक्रिया करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळेच ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी काढण्यात येणाऱ्या आरक्षण लॉटरीवर हरकती व सूचनांसाठी केवळ चार दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजेपर्यंत आक्षेपकर्त्यास हरकती व सूचना करता येईल. प्रभागातील झोनल कार्यालय व मनपा मुख्यालयातील निवडणूक विभागात त्या करता येतील. तथापि, मागविण्यात येणाऱ्या हरकती व सूचनांवर सुनावणी कधी होईल, याबाबत आयुक्तांनी कुठलीही तारीख जाहीर केलेली नाही. हरकती व सूचना प्राप्त होताच त्या तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP MajhaTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024ABP Majha Headlines :  11:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Embed widget