बुलडाणा :  जिल्ह्यातील देऊळगाव राजानजीक खामगाव -जालना महामार्गावर तीन जणांनी मिळून बस लुटल्याची घटना घडली आहे. लुटलेली बस ही रचना ट्रॅव्हल्सची असून, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास  चिखली ते देऊळगाव राजा दरम्यान असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुलावरून बस जात असताना तीन जणांनी अचानक ट्रॅक्टर आडवा लावून बस चालकास खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर त्याच्या जवळसे पैसे काढून घेतल्याचा प्रकार घडला.


या घटनेप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात रात्रीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ तीन तासात दोन लुटारूंना जेरबंद देखील केलं आहे. दरम्यान, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जयवंत सातव हे करत आहेत.  


रचना ट्रॅव्हल्सची बस ही अमरावतीहून शिर्डीला जात होती.  यावेळी रात्री अडीच वाजण्याच्य सुमारास खडकपूर्णा नदीवरील पुलावर ट्रॅक्टर आडवे लावून तीन लुटारुंनी गाडी थांबवून ड्रायव्हरला मारहाण केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच चालकांकडून लुटारुंनी 5 हजार रुपये काढून घेतले. त्याचबरोबर ट्र्रॅव्हल्सची चावी देखील काढून घेतली होती. संबंधीत घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी गेलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी ट्र्रॅक्टर आडवे लावल्यामुळे आरोपी आसपासच्या परिसरातील असल्याचा आमचा संशय होता. त्यानुसार आम्हा तपासाला सुरूवात केली. त्यानंतर आम्ही दोन आरोपींना 3 तासांच्या आत जेरबंद केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर आणि लुटलेले पाच हजार रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :