Wagh Bakri, Parag Desai Passes Away : वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं. त्यांनी अहमदाबाद (Ahmedabad) मधील खासगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई (Parag Desai) अहमदाबाद (Ahmedabad) मधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉक (Morning Waljk) साठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी (Dog Attack) हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर बाघ बकरी चाह सोशल मीडियावर चर्चेत आहे. याबाबत नेटकरी जाणून घेत आहेत..वाघ बकरी चहाबाबत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...
वाघ बकरी चहाबाबत तुम्हाला पडलेले 08 प्रश्न !
पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर बाघ बकरी चाह सोशल मीडियावर चर्चेत आहे. याबाबत नेटकरी जाणून घेत आहेत..वाघ बकरी चहाबाबत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...
wagh bakri chai
- वाघ बकरी चहाची स्थापना कधी झाली?
1919 साली गुजरात टी डेपो नावानं चहाची सुरुवात झाली. या ब्रँडचं पहिलं दुकान अहमदाबादमध्ये सुरु झालं तर 1934 साली कंपनीचं नाव वाघ बकरी करण्यात आलं.
- वाघ बकरी चहाची सुरुवात कुणी केली?
1892 दरम्यान नारनदास देसाई नामक एका व्यावसायिकानं दक्षिण आफ्रिकेत 500 एकरांवर चहाचं साम्राज्य फुलवलं. मात्र, महात्मा गांधींना झालेला भेदभावाचा त्रास त्यांनाही झाला आणि ते माघारी भारतात आले. मायदेशी परतल्यावर त्यांनी पुन्हा चहाच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं आणि 'गुजरात टी डेपो' चा जन्म झाला.
- वाघ बकरी चहाच्या चिन्हाची कहाणी काय?
नारनदास देसाई महात्मा गांधींचा फार आदर करायचे. गांधीजींचे विचार आणि व्यक्तीमत्व त्यांना प्रचंड आवडायचे. महात्मा गांधींनी आजन्म धार्मिक आणि जातीय भेदभावाचा विरोध केला आणि त्याच धरतीवर देसाईंनी कंपनीचा लोगो तयार करण्याचं ठरवलं. त्यानुसार एक वाघ आणि एक बकरी एकाच कपमधून चहा घेत असतानाचं चित्र त्यांनी आपल्यात चिन्हात वापरलं.
- वाघ बकरी चहाचा विस्तार कसा झाला?
1919 साली चहाची कंपनी स्थापन करुनही विस्तार करण्यात फार विलंब झाला. 1998 साली वाघ बकरी चहानं सिमोलंघन केलं आणि राजस्थानमध्ये विक्री सुरु झाली. पुढे 2007 ते 2009 दरम्यान महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कंपनीनं विस्तार केला.
- वाघ बकरी चहाचे कॅफे आहेत का?
बदल्यात्या युगाचा कल लक्षात घेत 2014 दरम्यान कंपनीनं 'वाघ बकरी टी लाउंज' सुरू करत 'कॅफे मार्केट'मध्ये पदार्पण केलं. मुंबईसह गुजरातमध्ये अनेक टी लाउंजेसची सुरुवात करण्यात आली.
- वाघ बकरी चहाचे इतर फ्लेव्हर्स आहेत का?
गेल्या अनेक वर्षांमध्ये चहाचे अनेक फ्लेव्हर्स बाजारात आले. तरुणांसाठी Ice tea तर तर फिटनेस फ्रीक्ससाठी Gren tea असे फ्लेव्हर्स बाजारात उपल्ब्ध झाले. ग्राहकांची गरज लक्षात घेतल वाघ बकरी चहानंही एक पाऊल पुढे टाकत Ice tea , Green tea, Lemon tea, Ginger tea सारखे अनेक फ्लेव्हर्स बाजारात आणले.
- वाघ बकरी कंपनी कॉफी विकते का?
हो! चहापासून सुरु झालेला वाघ बकरीचा प्रवास कॉफीपर्यंत पोहचला आहे. कंपनीनं अलीकडेच 'इंस्टंट कॉफी प्रीमिक्स' नावानं एक कॉपी प्रोडक्ट लँच केला आहे.
- आता वाघ बकरी कोण सांभाळतं?
नारनदास देसाई यांच्यानंतर वाघ बकरी चहाचा सांभाळ हा त्यांच्या तीन मुलांनी केला. रामदास देसाई, ओचवलाल देसाई आणि कांतीलाल देसाई अशी त्यांची नावं होती. त्यानंतर पियुष देसाई, पंकज देसाई,रसेश देसाई यांनी कंपनीचं काम पाहिलं तर आता देसाई कुटुंबाची चौथी पिढी वाघ बकरीचा व्यवसाय हाताळते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -