पुणे: एका पुणेकर 74 वर्षाच्या आजोबांना कॉल गर्लची सर्व्हिस (Pune Call Girl) घेणं चांगलंच महागात पडलंय. फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकडण्याची धमकी देत तीन महिन्यात या आजोबांकडून 30 लाख रुपये उकळले. आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने त्या आजोबांनीही कुणालाही सांगितलं नाही. शेवटी डोक्यावरून पाणी गेल्यानंतर आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 


पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने जुलैमध्ये ज्योती बनसोडे हिच्या मार्फत एका 'कॉल गर्ल'ची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. पोलिसांनी त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलीय. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. पोलीस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी पैशांची मागणी केली.


आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी 30 लाख 30 हजार रुपये दिले. परंतु दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी आरोपींनी दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले. 


फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत आरोपींनी हे पैसे उकळले आहेत. त्यानंतर आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन महिलेसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.


रुबाबात राहणं आणि कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला; 42 वर्षीय व्यक्तीची हत्या


तीन महिन्यांपूर्वी भिवंडीत अशीच एक घटना घडली होती. पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या भिवंडीतील 42 वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा (Call Girl) नाद जीवावर बेतला. कॉलगर्लवर पैशांची उधळपट्टी पाहून दोन कॉलगर्ल्सनी त्यांच्या बॉयफ्रेण्डशी संगनमत करुन या व्यक्तीच्या घरातील रोकड चोरण्याच्या उद्देशाने त्याची धारदार चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या (Murder) केली. ही घटना कल्याण-पडघा मार्गावरील बापगांव गावातील मल्हारनगर परिसरात घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोन कॉलगर्ल्ससह एक साथीदाराला अटक केली आहे.


ही बातमी वाचा: