Bank of Baroda E-Auction: देशातील अनेक सरकारी बँका वेळोवेळी अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव करत असतात. अशातच आता बँक ऑफ बडोदा देखील या सणासुदीच्या हंगामात ई-लिलाव आयोजित करणार आहे. बँक ऑफ बडोदा 30 ऑक्टोबर 2023 रोजी करवा चौथपूर्वी हा ई-लिलाव आयोजित करणार आहे. या लिलावात तुम्ही खूप कमी दरात अनेक प्रॉपर्टी खरेदी करू शकता.


भारतभर मालमत्ता खरेदी कण्याची संधी 


बँक ऑफ बडोदाने ट्वीटरद्वारे ई-लिलावाच्या संदर्भातील माहिती दिली आहे. भारतभर मालमत्ता खरेदी कण्याची संधी मिळणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी #BankofBaroda च्या मेगा-ई-लिलावात सामील व्हा आणि तुमच्या आवडीची मालमत्ता खरेदी करा, असे आवाहन करण्यात आलं आहे. शहरात तुमची स्वप्नातील मालमत्ता खरेदी करण्याची संधी तुम्हाला या ई लिलावात मिळणार आहे. 


व्यावसायिक, औद्योगिक, कृषी, सदनिका, जमीन, घर खरेदी करण्याची संधी


लहान घर असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. तुम्हालाही तुमचे हे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची खास संधी घेऊन आली आहे. जर तुम्ही सणासुदीच्या काळात घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक पर्याय आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देशातील मोठ्या शहरांमध्ये अतिशय कमी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता. या ई-लिलावामध्ये बँक ग्राहकांना व्यावसायिक, औद्योगिक, कृषी, सदनिका, जमीन आणि घर खरेदी करण्याची सुविधा देत आहे.


माहिती कुठे मिळेल


तुम्हालाही या ई-लिलावात सहभागी व्हायचे असल्यास, www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices या अधिकृत लिंकला भेट द्या. या लिंकवर तुम्हाला लिलावाशी संबंधित सर्व माहिती मिळेल.


बँका मालमत्तेचा लिलाव का करतात


देशातील अनेक सरकारी बँका वेळोवेळी अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव करत असतात. या ई-लिलावात, बँक अशा मालमत्तांची विक्री करतात की ज्यांच्या मालकांनी बँकेचे कर्ज फेडलेले नाही. मालमत्ता विकण्यापूर्वी, बँक मालकांना नोटीस बजावतात आणि जर ते पैसे भरण्यास सक्षम नसतील, तर बँक मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करतात. या ई-लिलावामध्ये, बँक त्या मालमत्तांची विक्री करता ज्यांच्या मालकांनी पैसे जमा केले नाहीत. कर्जाची परतफेड झालेली नाही. देशातील विविध भाग आणि शहरांमधील मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


अजितदादांच्या अडचणीत वाढ; शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी