नवी मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती. तेव्हापासून पोलीस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दाऊद शेखला (Dawood Shaikh) अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशश्रीचा (Yashashree Shinde) मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेखने हे दोन्ही फोन फॉरमॅट केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेखला यशश्री शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते. दाऊदने यशश्रीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र, या तपासात दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती. दाऊदकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. हे फोटो दाखवून तो यशश्रीला ब्लॅकमेल करत होता, असे सांगितले जाते. या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवले होते, अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते. त्यामुळे या तपासात दाऊद आणि यशश्री शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलीस तपासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरु शकला असता.
मात्र, यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. तर यशश्रीचा मोबाईल त्याने हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर टाकून दिला होता. तो मोबाइलही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, यशश्रीचा मोबाइलही दाऊदने फॉरमॅट केला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस तज्ज्ञांची मदत घेऊन दाऊदच्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळवू शकतात का, हेदेखील बघावे लागेल. तर यशश्री शिंदे हिचा मोबाईल दाऊदने सांगितल्यापासून हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असेल तो गेला कुठे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
उरण हत्याकांडात आणखी एक ट्विस्ट, आदल्या दिवशीच यशश्री शिंदे जुईनगरला दाऊद शेखला भेटली
दाऊदच्या पोलीस चौकशीदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिची हत्या होण्याच्या आदल्या दिवशीच ती दाऊद शेखला भेटली होती. नवी मुंबईतील जुईनगर येथे यशश्री आणि दाऊदची (Dawood Shaikh) भेट झाली होती. दाऊद पॉक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा यशश्रीच्या मागे लागला होता. त्याच्याविरोधात खटला सुरुच होता. पण तो मोजक्याच सुनावणीवेळी हजर असायचा. त्यामुळेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे यशश्रीने जुईनगरला दाऊदला भेटल्यानंतर पोलिसांकडे वेळीच तक्रार केली असती तर तो पुन्हा तुरुंगात गेला असता.
आणखी वाचा
यशश्रीने टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला की दाऊदच्या जबरदस्तीने?; आता टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर