नवी मुंबई: उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडात मुख्य आरोपी दाऊद शेख याला अटक करण्यात आल्यानंतर नवी मुंबई पोलिसांक़डून (Navi Mumbai Crime) त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याने यशश्रीची हत्या का केली आणि कशी केली, याबाबतचे सर्व पैलू तपासून पाहिले जात आहेत. या चौकशीदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिची हत्या होण्याच्या आदल्या दिवशीच ती दाऊद शेखला भेटली होती. नवी मुंबईतील जुईनगर येथे यशश्री आणि दाऊदची (Dawood Shaikh) भेट झाली होती. मात्र, यशश्रीने याबाबत कोणालाही सांगितले नव्हते. तिने वेळीच याबाबत कुटुंबीयांना किंवा पोलिसांना सांगितले असते तर तिचा जीव वाचला असता.
दाऊद शेख आणि यशश्री शिंदे याची पूर्वीपासून ओळख होती. हे दोघेही दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकत होते. 2019 साली दाऊदने तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर पोक्सोअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये, त्यास अटकही झाली होती. तो दोन महिने तुरुंगात होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा यशश्रीच्या मागे लागला होता. त्याच्याविरोधात खटला सुरुच होता. पण तो मोजक्याच सुनावणीवेळी हजर असायचा. त्यामुळेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे यशश्रीने पोलिसांकडे वेळीच तक्रार केली असती तर तो पुन्हा तुरुंगात गेला असता.
दाऊद शेख हा गेल्या काही दिवसांपासून लग्न करण्यासाठी यशश्रीच्या मागे लागला होता. लग्न करु आणि कर्नाटकमध्ये राहू, असे दाऊद तिला सातत्याने सांगायचा. मात्र, यशश्रीने त्याला नकार दिला. कर्नाटकमध्ये असतानाही तो स्वत:च्या किंवा मित्राच्या फोनवरुन यशश्रीला सतत फोन करायचा. मात्र, यशश्री त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती. त्याचाच राग मनात ठेऊन दाऊद शेखने यशश्रीचा निर्घृणपणे खून केला.
दाऊदने यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकले
दाऊद शेखकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. त्याने यापैकी काही फोटो सोशल मीडियावर टाकले होते. मात्र, यशश्री त्याला भेटल्यानंतर त्याने हे फोटो डिलिट केले होते. याच फोटोंवरुन दाऊद यशश्रीला बराच काळ ब्लॅकमेल करत होता. यशश्रीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना तिच्या अंगावर दोन टॅटू आढळले आहेत. यापैकी एक टॅटू दाऊद शेखच्या नावाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांमध्ये भांडण व्हायचे तेव्हा दोघेही फोनवर एकमेकांना ब्लॉक करायचे. तेव्हा दाऊदचा मित्र मोहसीनच्या माध्यमातून त्यांचा संवाद होत असायचा अशीही माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली.
आणखी वाचा
यशश्रीने टॅटू स्वत:च्या मर्जीने काढला की दाऊदच्या जबरदस्तीने?; आता टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर