नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शवला आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे उद्या म्हणजेच शुक्रवार (27 ऑक्टोबर) रोजी एपीएमसी मार्केट हे बंद राहणार आहे. पण यामध्ये एपीएमसीच्या तीन बाजारपेठा बंद राहतील. यामधील भाजीपाला आणि फळमार्केट मात्र सुरु राहिल. कांदा बटाटा, दाना आणि मसाल्याच्या बाजारपेठा या बंद राहणार आहेत. 


माथाडी कामगारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यता आला आहे. माथाडी नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे आता माथाडी कामगारांनी देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण पुकरालं आणि पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाची मागणी तीव्र होत गेली. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. 


कामगारांचा मोठा निर्णय


मराठा आरक्षणासाठी राज्यभरात संतापाची लाट उसळलीये. अनेक तरुण या आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच आता राज्य सरकार या कामगारांच्या निर्णयावर कोणती भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे. तसेच महत्त्वाच्या बाजारपेठा बंद राहणार असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. 


मनोज जरांगेंची आमरण उपोषणाची हाक


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक पुकारलीये. सुरुवातीला त्यांनी केलेलं उपोषण हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे उपोषण सोडवले होते. दरम्यान त्यावेळी मनोज जरांगे यांनी सरकरला 40 दिवसांची मुदत दिली होती. पण ती देखील मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा हाक दिली. तर सध्या जालना येथील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतलीये. 


या मुद्द्यावर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मनोज जरांगेंचं हे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारला यश येणार का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Manoj Jarange : 'माझ्या नवऱ्याला काही झालं तर त्याला सरकराच जबाबदार राहिल', जरांगेंच्या पत्नीने दिला सरकारला इशारा