Navi Mumbai News : नवी मुंबईमधल्या वाशीतील (Vashi) सेंट मेरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थ्यांनी (School Girl)  शाळेतील शौचालयात मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. शौचालय साफ करणारी महिला सफाईसाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. आजारपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाशी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 


शाळेत नेमकं काय घडलं?


मुग्धा कदम असं मृत मुलीचं नाव असून ती कोपर खैरणेला (Kopar Khairane) राहत होती. वाशीतील सेंट मेरी मल्टिपर्पज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवारी (15 जुलै)सकाळी हा प्रकार घडला. सकाळी साडेदहा वाजता मधल्या सुट्टीदरम्यान तीन शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील वॉशरुममध्ये गेली होती. मात्र वर्ग पूर्ण भरल्यावरही ही विद्यार्थिनी वर्गात आली नसल्याने तिची शोधाशोध सुरु करण्यात आली. याच वेळी शौचालय सफाईसाठी गेलेल्या महिलेला एक दरवाजा आतून बराच वेळ लॉक असल्याचं दिसलं. दाद ठोठावूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने लॉक तोडण्यात आला. यावेळी विद्यार्थिनी शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळली. शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीला तातडीने महापालिका रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 


पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली


याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांचं एक पथक शाळेत दाखल झालं.या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. शिवाय पोलिसांनी घातपाताची शक्यताही नाकारली. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.पोलीस अधिक तपास करत आहेत.


मुलीला ज्युवेनाईल डायबेटीज असल्याचं समोर


वाशी इथल्या एनएमएमसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे म्हणाले की, "तिचं पोस्टमॉर्टम संध्याकाळी करण्यात आलं. तिला ज्युवेनाईल डायबेटीज म्हणजेच टाईप 1 डायबेटीज होता. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. कलिना फॉरेन्सिक लॅबमधून मिळालेला तिचा व्हिसेरा नमुना हिस्टोपॅथॉलॉजी अहवालासाठी जतन करण्यात आला आहे.


हॉटेल मॅनेजरला एक किमीपर्यंत बोनेटवर फरफटत नेलं


नवी मुंबईतील तुर्भे येथे एका रेस्टॉरंट समोर लघुशंका करणाऱ्या तरुणाला रोखल्याने झालेल्या वादात संबंधित तरुणाला हॉटेलच्या मॅनेजरला तब्बल एक किलोमीटर पर्यंत आपल्या कारच्या बोनेट वर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. तुर्भे येथील संगीत बारमध्ये संबंधित तरुण आपल्या मित्रांसोबत मद्य विकत घेण्यासाठी आला होता. दारु घेतल्यावर हॉटेल बाहेरच लघवी करत असताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. यावरुन वाद झाला असता या तरुणाने इसमाने कार समोर उभ्या असलेल्या हॉटेलच्या मॅनेजरला बोनेटवरुन एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून यामध्ये कार चालक मॅनेजरला बोनेटवर फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा


Navi Mumbai News : रेस्टॉरंटसमोर लघुशंका करण्यास विरोध, तरुणाने हॉटेल मॅनेजरला एक किमीपर्यंत बोनेटवर फरफटत नेलं