Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिसरा आणि राज्यात पहिला नंबर मिळविणार्या नवी मुंबई महानहर पालिका विभागाला याचा सद्या विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण आहे शहरातील सर्वेच भागात रस्त्यावर कचरा आणि दुर्गंधी दिसत आहे. घणकचरा विभागाकडून योग्य लक्ष दिले जात नसल्याने नागरी वस्ती बरोबर एमआयडीसी भागात कचऱ्याचे साम्राज्य भर रस्त्यात , चौकात दिसू लागले आहे. पावसाळा सुरु होत असल्यामुळे यामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे. 


नवी मुंबई शहराला देशपातळीवर मिळत असलेल्या सन्मानामुळे या शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ , सुंदर , कचरामुक्त असलेल्या या शहराची ओळख घणकचरा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असाच सुमार दर्जाचे काम राहिल्यास देशात पहिला नंबर येण्याऐवजी असलेला तिसरा नंबर टिकवून ठेवता येईल की नाही, अशी शंका सर्व स्थरातून व्यक्त केली जात आहे.


नवी मुंबईतील अनेक भागात भर रस्त्यावर कचरा , घाणीचे साम्राज्य, ओसंडून वाहणार्या कचरा कुंड्या, आस्ताव्यस्त पडलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, अनधिकृत ड्रेबिज पहायला मिळत आहे. तुर्भे, रबाले, चिंचपाडा या भागातील झोपडपट्टी बहुल वस्तीत हे दृष्य नेहमीचे झाले आहे. वाशी , नेरूळ , कोपरखैरणे सारख्या नागरी वस्तीतही कचर्याचे ढिग दिसत असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


महानगर पालिका प्रशासनाने लोकांच्या सोयीसाठी फुटपाथ वर लिटल बीन्स ( कचर्याचे डबे ) बसविले आहेत. यामुळे रस्त्यावरून चालणार्या लोकांना हाताती प्लॅस्टिक पिशवी, रॅपर सहज लिटल बीन्स मध्ये टाकता येत होते. मात्र अनेक ठिकाणी ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. किंवा त्यांची संख्या अपुरी आहे.  रहिवाशांकडून घरात केलेल्या डागडूजीनंतर निघालेले डेब्रिज योग्य ठिकाणी न टाकता उद्यानाच्या कोपर्यात, मैदानात, चौकात टाकले जात आहे. दुसरीकडे अनधिकृत पणे बसणारे आठवडी बाजारातून मोठा कचरा निघत असून तो त्वरित उचलला जात नसल्याने संबंधीत ठिकाणी दुर्गेंधी पसरली जात आहे.


महानगर पालिकेकडून रस्त्यावर कचरा टाकणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नेमलेले भरारी पथक हॅाटेल वाल्यांकडून लक्ष्मीदर्शनात व्यस्त असल्याने दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. महानगर पालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी पालिकेतील घणकचरा विभागातील अधिकार्यांच्या बदल्या करून खांदेपालट केली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचार्यांनी जबाबदारीचे भान न ठेवल्यास स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिला नंबर येण्याचे नवी मुंबईचे स्वप्न ‘ दिवास्वप्न ‘ बनून राहिल.