नवी मुंबई : लोकसभेला (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) मराठ्यांचा (Maratha) फटका बसला असतानाच विधानसभेतही (Vidhan Sabha Election 2024) याची पुनरावृत्ती होईल असा घरचा आहेर आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 61 नवीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम . डी. मंगेश मोहिते यांनी घेतला आहे. एकीकडे 1 लाख मराठा उद्योजकाचे टार्गेट पूर्ण होत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम होणार आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले, 1 लाख मराठा उद्योजकाचे टार्गेट पूर्ण होत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम होणार आहे. आचारसंहितेमुळे आधीच 50 कोटींचा व्याज परतावा मराठा उद्योजकांना देण्यास अडचणी होताना आता कर्मचारी काढल्याने करोडो रूपयांचा परतावा मिळणे मुश्किल होणार आहे.मंडळातील कर्मचारी आऊट सोर्सिॅग टेंडरमध्ये सुद्धा एम डी मंगेश मोहिते यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.सध्या 92 हजार मराठा उद्योजक बनले असून 7 हजार कोटी रूपयांचे कर्ज बँकेने दिले आहे तर 450 कोटींचा व्याज परतावा आण्णासाहेब पाटील महामंडळाने लाभार्थ्यांना दिलाय.
मराठा समाजाचा सरकारवर रोष वाढेल : नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील म्हणाले, महामंडळाचे मुख्य कार्यालयाचे कर्मचारी यांची आवश्यकता असते. कारण लाभार्थ्यांशी ते प्रत्यक्षात संपर्कात असतात. आचारसंहितेमुळे 50 कोटीचा व्याज परतवा आम्हाला देता आला नाही. अचानकपणे जर कर्मचारी कपात केले तर पैसे आले असले तरी कर्मचाऱ्यांअभावी पैसे देण्यास दीड ते दोन महिने लागतील. त्यामुळे मराठा समाजाचा सरकारवर रोष वाढेल, असे देखील नरेंद्र पाटील म्हणालेय
61 कर्मचाऱ्यांना काढताना मला विश्वासात घेतले नाही : नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील म्हणाले, मुख्यमंत्री मराठा समाजासाठी तळमळीने काम करत आहे पण काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाचा सरकारवरील रोष वाढेल यासाठी प्रयत्न करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम . डी. मंगेश मोहिते हे आहेत. मी अध्यक्ष असताना 61 कर्मचाऱ्यांना काढताना मला विश्वासात घेतले नाही. त्यांचा मी निषेध करतो याची तक्रार मी मुख्यमंत्री आणि सचिवांकडे करणार आहे.