Navi Mumbai Latest Marathi News Update: नवीन पनवेल मधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू आहे. त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खड्यात पडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून अनेकजणांनी रेल्वेवर ताशोरे ओढले आहेत. चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरातील खड्ड्यांबाबत प्रश्न उपस्थित झाला असून स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
पनवेलमध्ये रेल्वे कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात अनेक महिन्यांपासून पाणी साचलेलं आहे. ठेकेदारांकडून येथे सुरक्षा बाळगण्यात आलेली नाही. आज सकाळी बाजूलाच असलेल्या झोपडपट्टी मधील लहान मुलगी या परिसरात खेळत होती. त्यावेळी ती चार वर्षांची मुलगी साचलेल्या पाण्यात पडली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माही वाघमारे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.
पंचशील नगर येथे खड्यातील पाण्यात बुडून माही वाघमारे या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वेचे काम पुर्णत्वास गेले नसल्याने साचलेल्या पाण्यात लहानग्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या आधी देखील या खड्यात पडून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. स्थानिक ठेकेदाराविरोधात आक्रमक झाले आहेत.
नवीन पनवेल मधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू आहे आणि या कामासाठी एक मोठा खड्डा कित्येक महिन्यापासून खणून ठेवला आहे. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने आज चार वर्षाच्या चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले. घरा जवळच रेल्वेचे काम चालू असल्याने चिमुकली खेळत असताना या खड्ड्यात पडली व दुर्दैवाने तिचा यात मृत्यू झाला. या खड्ड्यात पडून याआधीही मृत्यू झाला आहे. पण हा खड्डा गेली कित्येक महिने असून कोणाला दिसून आले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. शेजारी लोक वस्ती असताना सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमण्यात आलेला नाही. या आधी देखील 2019 मध्ये याच ठिकाणी पाण्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. अश्या या चिमुकल्यांच्या बळींना जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर पोलीस कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्यानेच कारवाई होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या -