नवी मुंबई: देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात असतानाच नवी मुंबईत हृदयद्रावक घटना घडली आहे. नवी मुंबईतील (Navi mumbai) उलवे येथील जावळे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाची तीव्रता अतिशय भयानक होती, त्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात दम तोडला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात, एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. 


देशभरात आणि घरोघरी दिव्यांची उजळण करून आणि विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली असतानाच दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईत घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घरातील 5 किलोच्या दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली होती, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या भीषण स्फोटात घरातील 3 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये, एक महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर, कुटुंबातील 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा


पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम