Mumbai Accident : कामावरुन सुट्टी झालेल्या तरुणी घरी जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिलीये. यातच दोन तरुणींचा मृत्यू झाला. ही घटना नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर घडली. दरम्यान, कार चालकाने तरुणींना उडवल्यानंतर पळ काढलाय. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


दोघीही कोपरीच्या दिशेने विरुद्ध मार्गावरून येत होत्या


अधिकची माहिती अशी की, भरधाव कारच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना कोपरी येथे पामबीच मार्गावर घडली आहे. अपघातानंतर कार चालकाने पळ काढला असून एपीएमसी पोलिस होण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्कृती खोकले आणि अंजली पांडे दोघीही तुर्भे एमआयडीसी मध्ये खासगी कंपनीत कामाला होत्या. कामावरून सुटल्यानंतर दोघीही कोपरीच्या दिशेने विरुद्ध मार्गावरून येत होत्या. त्याचवेळी पामबीचवरुन सायन पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीरजखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिकमध्ये उड्डाणपुलावर भीषण अपघात


दरम्यान, नाशिक मुंबई अग्रा महामार्गावर उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय..या अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प , उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर उड्डाण पुलावर  वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे..वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून गेल्या 30 मिनिट पासून ही वाहतूक ठप्प आहे...










इतर महत्त्वाच्या बातम्या 


Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'


Baba Siddique: सिद्दीकींच्या हत्येच्या प्लॅनसाठी आरोपी अन् सूत्रधार अनमोल बिश्नोई या ॲपवरून संपर्कात; आरोपपत्रात मोठे खुलासे, बँकेत खातं काढलं अन् पैसे...