नवी मुंबई :  नवी मुंबईत मेट्रो कधी सुरु होणार हा नवी मुंबईकरांच्या (Navi Mumbai Metro news) दृष्टीनं सर्वात मोठा प्रश्न आहे. आता नवी मुंबई मेट्रो सुरु होण्याच्या दिशेनं वेगानं पावलं पडत असल्याचं दिसून येत आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सोप्पी व्हावी यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्राने जोडण्याची योजना आखली आहे. 


सिडको आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्था संयुक्तपणे या मार्गाचे काम पाहणार आहेत. नवी मुंबई परिसरात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) हे काम पाहणार आहे तर, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए या कामाची पाहणी करणार आहे. मेट्रो 8 कॉरिडॉरमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहेत. 2014 पासून एमएमआरडीए या मेट्रो मार्गासाठी प्रयत्नशील आहे. जवळपास 35 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 15  हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सात स्थानकं असणार आहेत. तसंच, दररोज नऊ लाख प्रवाशांना याचा फायदा होणार नाही.


प्रकल्प प्रचंड वेळखाऊ आणि खार्चिक


प्रस्तावित मार्गानुसार ही लाईन अंशत: भूमिगत असणार आहे.  घाटकोपर येथील अंधेरी आणि ईस्टर्न एक्सप्रेस वे दरम्यान हा मार्ग भूमिगत असणार आहे. तर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असणार आहे. भूमिगत प्रकल्प असल्याने हा प्रकल्प प्रचंड वेळखाऊ आणि खार्चिक असणर आहे.  


नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर मेट्रो महाराष्ट्र दिनादिवशी सुरू होण्याची शक्यता


 नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर तळोजा असा 11 किलो मीटरचा हा मेट्रो रेल्वे मार्ग आहे. मात्र अर्धवट कामामुळे गेल्या जवळपास 12 वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे. अखेर या मार्गावरील सर्व स्थानकांचे काम पुर्णत्वास आल्याने येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ही मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा मानस सिडकोचा आहे. यासाठी सद्या युध्द पातळींवर कामे केली जात आहेत. मेट्रो सुरू करण्यासाठी लागणारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी सुध्दा घेण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर मार्गावरील ट्रॅकवर मेट्रो गाडी चालवून अनेक चाचण्या सुध्दा घेण्यात आल्या आहेत. दरम्यान मेट्रो रेल्वेचे दर हे परिवहनच्या वातानुकुलित बस पेक्षा कमी आहेत. मेट्रो सुरू झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या  खारघर , तळोजा भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.