Anand Mahindra Viral Tweetमुंबई (Mumbai) शहरात विकास कामांमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत, अशी अनेक मुंबईकरांचे मत आहे. पण नवी मुंबई (Navi Mumbai) येथे खेळण्यासाठी एक अनोखं प्ले ग्राउंड तयार करण्यात आलं आहे. हे प्ले ग्राउंड एक ब्रिजच्या खाली आहे. या ब्रिजखाली (Bridge) मुलं बॅडमिंटन (Badminton), क्रिकेट (Cricket) आणि बास्केटबॉल (Basketball) यांसारखे खेळ खेळतात. पुलाखाली प्ले ग्राउंड तयार करण्याची ही आयडिया उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना आवडली आहे. नुकताच आनंद महिंद्रा यांनी या प्ले ग्राउंडचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 


आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण नवी मुंबई येथील एका पुलाखाली तयार करण्यात आलेल्या प्ले ग्राउंडबाबत सांगताना दिसत आहे. तो म्हणतो, मी नवी मुंबईमध्ये आहे. इथे एका पुलाखाली प्ले ग्राउंड तयार करण्यात आलं आहे. इथे लोक क्रिकेट, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळू शकतात. इतकंच नाही तर क्रिकेट खेळताना बॉल बाहेर जाऊ नये, यासाठी इथे नेट देखील लावली आहे. या प्ले ग्राउंडवर फ्री एन्ट्री आहे.' व्हिडीओमध्ये काही मुलं या प्ले ग्राउंडवर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. 


आनंद महिंद्रा यांनी नवी मुंबई येथील या पुलाखाली असणाऱ्या प्ले ग्राउंडचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलं, 'ट्रान्सफॉर्मेशनल, हे प्रत्येक शहरात करुयात'


पाहा व्हिडीओ: 






व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 


आनंद महिंद्रा यांनी शेअर केला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेक जण पुलाखाली प्ले ग्राउंड तयार करण्याच्या आयडियाचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. 73 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 


भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते विविध व्हिडीओ आणि फोटो ट्विटरवर शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. ट्विटरवर आनंद महिंद्रा यांना  10.4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या:


Anand Mahindra: वेटरची कमाल! एका हातात उचलतो डोशाच्या 16 प्लेट्स; आनंद महिंद्रा देखील झाले इम्प्रेस, व्हिडीओ शेअर