एक्स्प्लोर

Navi Mumbai Ulwe Chikoo Seed: श्वास घेण्यास त्रास आणि घरघर, रुग्णाच्या फुप्फुसात तीन महिने अडकलेली चिकूची बी सापडली!

Navi Mumbai Ulwe Chikoo Seed: चिकूची बी फुप्फुसात तीन महिने अडकली, डॉक्टरांनी कोणती शस्त्रक्रिया केली?

Navi Mumbai Ulwe Chikoo Seed Stuck in Lung: सततचा श्वास घेण्यास त्रास (Chikoo Seed), घरघर आणि उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्रस्त झालेल्या 38 वर्षीय व्यक्तीच्या आजारामागचे कारण डॉक्टरांनाही सुरुवातीला कळले नाही. मात्र, सखोल तपासणीत त्याच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून चिकूची बी अडकून राहिल्याचे उघड झाले. नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथील फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ही बी यशस्वीरीत्या (Ulwe) काढून रुग्णाला नवजीवन दिले. उपचारानंतर रुग्णाचा श्वासोच्छ्वास पूर्ववत झाला असून, आता कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ते दैनंदिन जीवन जगत आहे.

नेमकं काय घडलं? (Navi Mumbai Ulwe Chikoo Seed Stuck)

उलवे येथील 38 वर्षीय श्री प्रसाद नाखवा यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच छातीत घरघर जाणवत होती. सुरुवातीला त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. औषधांमुळे काही काळ आराम मिळत असला तरी कायमस्वरूपी फरक आढळला नाही. त्यानंतर एका डॉक्टरांनी त्यांना ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला दिला. पुढील तपासणीसाठी रुग्णाने मेडिकव्हर हॉस्पिटलकडे धाव घेतली.

मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर येथील फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि डॉ. तनय सिन्हा तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या टिमने रुग्णाची तपासणी केली. एचआरसीटी स्कॅनमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत (लेफ्ट मेन ब्रॉन्कस) अरुंदपणा दिसून आला. मात्र तो कफ झाल्याने आहे की इतर कोणत्या कारणामुळे, हे स्पष्ट होत नव्हते.

याबाबत माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर येथील फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल म्हणाले, ब्रॉन्कोस्कोपीदरम्यान रुग्णाच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकलेली आढळली. त्यामुळे श्वासनलिका जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. त्याचबरोबर त्या भागात सूज निर्माण झाली होती. जाळीसारख्या विशेष वैद्यकीय उपकरणाच्या (मेश स्नेअर)  साहाय्याने भूल देऊन ही बी काळजीपूर्वक काढण्यात आली. त्यानंतर लगेचच श्वासनलिका खुली झाली आणि रुग्णाला मोकळा श्वास घेता आला.

डॉ. पटेल पुढे सांगतात की, ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. कारण बी जवळपास तीन महिने श्वासनलिकेत अडकून राहिल्याने ती श्वासनलिकेच्या आतील भिंतीला घट्टपणे चिकटली होती. शिवाय तिचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे उपकरणाने पकड घेणे आव्हानात्मक होते. जवळपास 50 मिनिटे चाललेल्या या प्रक्रियेत अत्यंत संयम आणि अचूकतेने काम करून कोणतीही दुखापत न करता बी यशस्वीरीत्या काढण्यात आली.

प्रौढांमध्ये अन्नाचा कण किंवा बी श्वासनलिकेत अडकण्याच्या घटना तुलनेने दुर्मीळ असतात. बिया किंवा इतर कठिण पदार्थ अनेक महिने श्वासनलिकेत राहू शकतात आणि त्यांची लक्षणे कफ साचणे किंवा फुफ्फुसातील गाठीसारख्या इतर आजारांप्रमाणे दिसू शकतात.

बी काढल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांशी सविस्तर चर्चा केली असता, सुमारे तीन महिन्यांपूर्वी चिकू खाताना रुग्णाला अचानक ठसका लागल्याची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सुरुवातीला त्रास कमी झाल्यामुळे ही बाब महत्त्वाची वाटली नाही आणि डॉक्टरांनाही सांगितली गेली नव्हती. त्यामुळे निदान होण्यास विलंब झाला. वेळेवर उपचार झाले नसते तर गंभीर संसर्ग, वारंवार न्यूमोनिया किंवा डाव्या फुफ्फुसाचा काही भाग निकामी होण्यासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकल्या असत्या.

ब्रॉन्कोस्कोपीनंतर अवघ्या दोन तासांत रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे आणि रुग्णाने हळूहळू कामांनाही सुरुवात केली आहे.

मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर येथील फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. तनय सिन्हा म्हणाले, प्रत्येकाने जेवताना बोलणे, हसणे किंवा घाई करणे टाळावे. त्यामुळे अन्नाचा कण किंवा फळांच्या बिया चुकून श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ठसका लागल्यानंतर दीर्घकाळ खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. श्वासनलिकेत अडकलेली बाहेरील वस्तूचा शोध घेण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी ही सर्वात प्रभावी उपचारपद्धती आहे.

मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले, दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही अचूक निदान आणि यशस्वी उपचार करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे.

 नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे  केंद्र प्रमुख संदीप जोशी म्हणाले, योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा यशस्वी उपचारांमधून आमची रुग्णकेंद्रित सेवा आणि वैद्यकीय उपचांमध्ये असलेल्या आधुनिक सुविधांची प्रचिती येते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पूजा-सोहमच्या लग्नाआधी वडिलांनी भावावर सोपवली मोठी जबाबदारी; भेटीनंतर भावाची Reaction काय होती?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget