एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम पुढे ढकलला
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे आजचा कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात आला.

नाशिक : नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे आजचा कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात आला. कार्यक्रम रद्द करावा लागल्याने तुकाराम मुंढेंनी नागरिकांची माफीही मागितली. तुकाराम मुंढे यांच्या आईंची प्रकृती बिघडल्याने हा कार्यक्रम रद्द करावा लागला, अशी माहिती आहे. मात्र अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी निवेदन स्वरुपात नोंदवून घेतल्या. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असतानाही तुकाराम मुंढे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्याला नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
अहिल्यानगर
क्राईम






















