नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.
कालिका मंदिरात आरती होताच, तुकाराम मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली. संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास, दुकाने हटवू असा इशारा यावेळी मुंढेंनी दिला. इतकंच नाही तर मंदिराबाहेरील रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचाही इशारा दिला.
नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिरात आज सकाळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी 8.30 वाजता ते मंदिरात दाखल झाले. मात्र मंदिर परिसरात पाऊल ठेवताच त्यांना प्लास्टिक पिशव्या निदर्शनास पडल्या. त्यामुळे तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.
दरम्यान कालिका संस्थानच्या अध्यक्षांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केल्यानंतर, मुंढेंनी देवीची मनोभावे आरती केली. मात्र आरती होताच मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, त्यांनी अचानक परिसरातील प्रसाद स्टॉल्सची पाहणी केली. त्यावेळी त्यांना सर्वच स्टॉल्सवर प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याचं निदर्शनास आलं.
हे पाहून तुकाराम मुंढेंनी संध्याकाळपर्यंत प्लास्टिक बंद न झाल्यास, तुमची दुकानं हटवली जातील, असा इशारा दिला. शिवाय मंदिर पदाधिकाऱयांनाही त्यांनी कापडी पिशवीचा वापर करा असा सल्ला दिला.
प्लास्टिक सापडल्यास दुकान कायमचं बंद: पर्यावरण मंत्री
प्लास्टिक बंदीविरोधात पर्यावरण खात्याने कडक पावलं उचलली आहेत. प्लास्टिक पिशवी सापडेल ते दुकान कायमचं बंद केलं जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी दुकानदारांकडून आता प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. या प्रतिज्ञापत्रात प्लॅस्टिक वापरणार नाही असं नमूद करून घेतलं जाणार आहे. सर्वांना पुरेशी संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आता कारवाईला समोरं जावं लागेल असाच पवित्रा पर्यावरण मंत्र्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्या वेळेस कुणाकडे प्लास्टिक सापडल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो आहे. दुसऱ्या वेळेस 10 हजार आणि तिसऱ्या वेळेस 25 हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे.
कोणत्या प्लास्टिकवर बंदी?
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक (डब्बे, चमच, पिशवी), फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं (यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही).
संबंधित बातम्या
प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचं बंद करणार : रामदास कदम
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष कृतीदलाची स्थापना
प्लास्टिक बंदी योग्यच, सरकारकडून हायकोर्टात निर्णयाचं समर्थन
प्लास्टिकबंदीचं धोरण दुटप्पी, वीरेन शाहांकडून प्रश्न उपस्थित