एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशकात अनोखा स्वातंत्र्यदिन, रोबोंच्या हस्ते ध्वजारोहण
नाशिकमध्ये धनलक्ष्मी प्राथमिक विद्यालयात आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात झेंडावदन करण्यात आलं.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार करण्यासाठी नाशकात डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील धनलक्ष्मी प्राथमिक विद्यालयात रोबोटिक्स पद्धतीने ध्वजारोहण आणि संचलन करण्यात आलं.
धनलक्ष्मी प्राथमिक विद्यालयातच आठवीच्या काही विद्यार्थ्यांनी तीन दिवस रोबो तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर पाच दिवसात त्यांनी हा रोबो तयार केला. रोबोंच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात झेंडावदन करण्यात आलं.
ISRO चे अविनाश शिरोडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने हजर होते. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
पाहा आणखी फोटो
72 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभरात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement