एक्स्प्लोर
नाशिकमध्ये आईस्क्रीमचं आमिष दाखवून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नाशिक : आईस्क्रीम खाऊ घालण्याच्या बहाण्याने 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. नाशिक रोड परिसरात 4 वर्षाच्या मुलीवर 51 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केले आहेत. नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या 51 वर्षीय सुभाष झवर या आरोपीनं काल रात्री शेजारच्या मुलीला आईस्क्रीमचं आमिष दाखवत घरी बोलावलं. घरी आल्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुभाष झवर याच्यावर नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
आणखी वाचा























