या बैठकीला एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेही अनुपस्थित राहिल्या. वैयक्तिक कारणानं आपण बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचं रोहिणी खडसेंनी स्पष्ट केलंय. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
विखे ज्या पक्षात जातात तिथं खोडी करतात -
"राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतल्यानंतर ते म्हणाले होते, की नगरमध्ये 12-शून्य करू, मात्र तसं काहीही न होता. उलट आमच्या आहे, त्यापैकी दोन जागा कमी झाल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला, असं मला वाटत नाही", असं म्हणत माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली. राधाकृष्ण विखे-पाटील आणि मधुकर पिचड पक्षात आल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या सातवर गेली होती. परिणामी ही संख्या वाढण्याची अपेक्षा असताना कमी झाली. असं सांगत विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोडी करतात, अशी टीका राम शिंदे यांनी केली.
स्नेहलता कोल्हे, कर्डिले यांचाही विखे-पाटलांवर आरोप -
कोपरगाव, राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार अनुक्रमे स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनीही विखेंचा फायदा झाला नसल्याचे सांगितले. विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उभे केले. मात्र, त्यांचं डिपोजीट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. एकप्रकारे पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे पराभव झाल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी माझाशी बोलताना सांगितले. तर, शिवाजी कर्डिले यांनीही भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 12 डिसेंबरला गोपीनाथगड येथे झालेल्या मेळाव्या एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्याकारणामुळे तर रोहिणी खडसे गैरहजर राहिल्या नाहीत ना? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा -
80 तासांचं सरकार पाहून आनंद नाही तर धक्का बसला : पंकजा मुंडे
आम्ही नेहरू, गांधींना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा
Ram Shinde | इनकमिंगचा भाजपला फायदा झाला नाही, राम शिंदे यांनी व्यक्त केली नाराजी | ABP Majha