मुंबई : स्वातंत्र्यवीर सावकरांवरुन काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. कारण, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवरुन केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत आहेत. इथं तडजोड होणार नसल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. रेप इन इंडिया या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यावर राहुल गांधींनी आपण राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहोत. त्यामुळं माफी मागणार नाही असं वक्तव्य केलं होतं.

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनीही स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेला दिला आहे.

संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा
देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' असा केला होता. या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत विचारला होता. या वक्तव्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना संजय राऊत यांनी याविषयी दोन ट्विट लागोपाठ केले आहेत.
राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले?
"वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत". जय हिंद.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे". जय हिंद


राहुल गांधी काय म्हणाले होते?
काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.

'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधींचा हल्लाबोल, "माझं नाव राहुल सावरकर नाही, मी माफी मागणार नाही"

BHARAT BACHAO | "माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी", भारत बचाओ रॅलीत राहुल गांधींचं भाषण | ABP Majha