एक्स्प्लोर
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलणार
नाशिक : त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील पार्वतीची पुरातन मूर्ती बदलण्यात येणार आहे. ऐतिहासिक मंदिरातील श्रद्ध्येय पुरातन मूर्ती बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जुन्या मूर्तीऐवजी नव्या मूर्तीची पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. मूर्ती जीर्ण आणि खंडित झाल्यामुळे या बदलाला संमती देण्यात आली आहे. जगन्नाथ पुरीच्या मूर्तीबदलानंतरची देशातली दुसरी तर महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे.
मंदिर प्रशासनाच्या विश्वस्त ललिता शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मात्र नवी मूर्ती स्थापित करण्याबरोबरच जुन्या मूर्तीचंही संवर्धन करण्याची अट घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाविकांना जुनी मुर्तीही दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement