एक्स्प्लोर

भुजबळांचं नाशकात जंगी स्वागत, सहा दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर

भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या राजकारणावर भुजबळ लवकरच पकड घेतील, असा सूचक इशारा दिला.

नाशिक : तुरुंगातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले. पाथर्डी फाट्यापासून ढोल ताशाच्या गजरात भुजबळांचं स्वागत करण्यात आलं. भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या राजकारणावर भुजबळ लवकरच पकड घेतील, असा सूचक इशारा दिला. 14 ते 19 जून असा सहा दिवसांचा भुजबळांचा नाशिक दौरा आहे. भुजबळ उद्या जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर येवला या त्यांच्या मतदारसंघात  जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येवल्यातच मुक्काम असेल. शनिवारी 16 जूनला येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ दुपारी दीड वाजता शिर्डीच्या दिशेने रवाना होतील. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची ते भेट घेतील. त्यानंतर नाशिकच्या भुजबळ फार्मवर मुक्काम करणार आहेत. रविवारी 17 जून रोजी सकाळी दहा वाजता सप्तश्रृंगी गडावर जाऊन ते देवीचं दर्शन घेतील. त्यानंतर नाशिकला मुक्काम असेल. भुजबळ सोमवारी 18 जूनला सकाळी दहा वाजता नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. तिथे दर्शन घेतल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधीचं दर्शन घेतील आणि एमईटी कॉलेजला भेट देतील. त्यादिवशीचा मुक्कामही नाशिकलाच असेल. मंगळवारी 19 जूनला सकाळी 11 वाजता नाशिकहून मुंबईला जातील.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली

IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

Embed widget