एक्स्प्लोर

Nashik Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिराचे भाविकांना दर्शन घेता येणार नाही, नेमकं कारण काय?

Nashik: नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत (Trimbakeshwar Temple) महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून हे मंदिर सात दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

Nashik: नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत (Trimbakeshwar Temple) महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून हे मंदिर आठ दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) आठ दिवस बंद राहणार आहे. अति प्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Trimbakeshwar Temple) संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र वरील काळात त्रिकाल पूजा, पुष्प पूजा या नित्य नैमित्तिक पूजा सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. 

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Trimbakeshwar Temple) दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. त्यासोबतच मंदिराचे जे काही संवर्धनाचे काम होणार असून ते भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple) अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याच दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्रंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar Temple)  येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येथील शिवलिंगात ब्रह्म विष्णू महेश असे तीन उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा ज्याला स्थानिक लोक पाळ असे म्हणतात त्या पाळावरचे कवच देखील निघू लागले आहे. या आधीच ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे उपाययोजना म्हणून मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता दिनांक 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून दिली आहे तरी सर्व भाविकांनी मंदिर प्रशासनात सहकार्य करावे अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget