नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरु असताना शिवसेना आणि शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक भिडले. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे.

नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना उमेदवार दराडे यांचे समर्थक आणि शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांचे समर्थक एकमेकांना भिडले.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान

शिवसेनेने निवडणुकीत माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप दराडे समर्थकांनी बेडसे समर्थकांवर केला. याचा वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्याची माहिती आहे.

हाणामारीच्या प्रकारानंतर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. खुद्द पोलिसआयुक्त रवींद्र सिंगल यांनी मतदान केंद्राची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 12 हजार 56 मतदार आहेत. त्यात 9 हजार 363 पुरुष मतदार, तर  2 हजार 693 महिला मतदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 380 मतदार जळगाव तालुक्‍यात असून त्यानंतर भुसावळ तालुक्‍यात 1 हजार 364, अमळनेर तालुक्‍यात 1 हजार 33 तर चाळीसगाव तालुक्‍यात 992 इतके मतदार आहे.

पाहा व्हिडिओ :