एक्स्प्लोर
मागेल त्याला उमेदवारांचे क्रिमिनल रेकॉर्ड मिळणार, नाशिक पोलिसांचा उपक्रम
प्रातिनिधिक फोटो
नाशिक : निवडणूक आयोगानंतर आता नाशिक पोलिसही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रभागातील उमेदवाराचं क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, याची माहिती मतदारांना नि:शुल्कपणे देण्याची सुविधा नाशिक पोलीसांनी सुरु केली आहे. अशी सुविधा देणारं राज्यातलं नाशिक हे एकमेव पोलीस आयुक्तालय असणार आहे. सध्या गुंडांनी राजकारणात येण्याचं आणि राजकारण्यांनीही त्यांना पावन करण्याचा धडाका सुरु केला आहे. याविरोधात सर्वसामान्यांमध्ये अव्यक्त रोषही आहे. परंतू अनेकदा आपल्या प्रभागातील उमेदवारावर खरंच किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मतदारांना नसते. हीच गरज ओळखून नाशिक पोलीसांनी हे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी गुंड उमेदवारांची कुंडली मतदानकेंद्रांबाहेर लावणार आहे. परंतू तत्पुर्वीच अशा गुन्हेगारांची माहिती नागरीकांना मिळावी यासाठी नाशिक पोलीसांनी हा उपक्रम सुरु केला आहे. झोन-1 मध्ये मागेल त्याला निशुल्क माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकंच नाही तर पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 गुंडांना तडीपार केलं असून 12 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव प्रोसेसमध्ये असल्याची माहिती डीसीपी श्रीकांत धिवरे यांनी दिली.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















