नाशिक : नाशिकमधील टाके घोटी इथल्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर इगतपुरी पोलिसांनी छापा टाकला आहे. बीभत्स नृत्य पार्टी करणाऱ्या सात तरुणींसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील जी.एम.बायोसाईड कंपनीच्या डीलर्स मिटिंगदरम्यान हा बीभत्स नृत्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती अज्ञाताने पोलिसांनी दिली होती. त्यानंतर इगतपुरी पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला.
या प्रकरणी बायोसाईड कंपनीचे भोर तालुक्यातले दोन व्यवस्थापक, संगमनेरचे एक व्यवस्थापक आणि नाशिकचे एक संचालक असे चार मुख्य अधिकारी तसंच विविध जिल्ह्यातील वितरक अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच डीजेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या सगळ्यांवर विनापरवानगी पार्टी करणं, बीभत्स नृत्य करणं आणि मद्यपान करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर ताब्यात घेतलेल्या सात मुलींना सुधारगृहात पाठवलं आहे. सर्व 15 जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नाशकात रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्या 7 मुलींसह 15 जण अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 11:33 AM (IST)
पुण्यातल्या जी.एम.बायोसाईड कंपनीच्या डीलर्स मिटिंगदरम्यान हा बीभत्स नृत्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -