शिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवात साईदर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान केले.


यावेळी दक्षिणापेटी, डोनेशन कांऊटर, ऑनलाईन डोनेशन, चेक, डीडी आणि सोळा देशातील परदेशी चलनाचा दानात समावेश आहे. यात 12 लाखांचे सोने आणि तीन लाखांच्या चांदीचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात एक कोटीं रुपयांनी वाढ झाली आहे.

डोनेशन बॉक्स 2 कोटी 52 लाख, डोनेशन कांऊटर 1 कोटी 10 लाख, डेबीट कार्डद्वारे 35 लाख, ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून 26 लाख, 29 लाख रुपये चेक आणि डीडीद्वारे संस्थानला प्राप्त झाले आहेत.

बारा लाख रुपयांचे 486 ग्रॅम सोने, तीन लाखांच्या साडे नऊ किलो चांदीचाही दानात समावेश आहे, तर 3 लाख 36 हजार रुपयांचे परकीय चलनही साईचरणी भाविकांनी अर्पण केले आहे.