एक्स्प्लोर

नाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

एकंदरीतच 16 मे ते 26 मे या दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ही सगळी कारवाई करत एकूण 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर 25 किलो एमडी ड्रग्ज, 90 लाख रुपयांची जॅग्वार सह एक सफारी कार आणि इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 20 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक : ड्रग्ज रॅकेटचा पर्दापाश करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. मुख्य सूत्रधाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एमडी ड्रग्स तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या एका असिस्टंट रिसर्च सायंटीस्टला नाशिक क्राईम ब्रँचने उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून अटक केली. एमडी ड्रग्जची ज्या ठिकाणी निर्मिती केली जात होती, तो पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील अड्डा देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. 16 मे रोजी पाथर्डी फाटा परिसरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने एका सफारी कारमधून प्रवास करणाऱ्या रणजित मोरे, पंकज दुंडे आणि नितीन माळशेदे या तिघांकडून 265 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. त्यांच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एमडी ड्रग्जच मुंबई कनेक्शन समोर येताच पोलिसांच एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं आणि त्यांनी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून नदीम सलीम सौरठिया आणि सफैउल्ला फारूक शेख या दोघांना अटक करत, त्यांच्याकडून 44 लाख रुपये किमतीचे तब्ब्ल 2200 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. हे ड्रग्स ते ज्या व्यक्तीकडून खरेदी करत होते, तो अरविंद कुमार मुझफ्फरनगरमध्ये फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रँचचं एक पथक मुझफ्फरनगरला रवाना झालं होतं आणि अखेर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच साथीदाराच्या मदतीनं त्याने बोईसर मध्ये एका घरातच एमडी ड्रग्स बनवण्याची प्रयोगशाळा सुरु असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने बोईसर गाठत अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत याला ताब्यात घेत, 4500 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एम डी तयार करण्यासाठी लागणारी 18 किलो क्रूड पावडर आणि प्रयोगशाळेतील इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 80 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे यातील मुख्य सूत्रधार अरविंदकुमार हा मागील 10 वर्षांपासून फार्मासुटिकल क्षेत्रात काम करत असून त्याने एमएससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) च शिक्षण घेतलं आहे. त्याने असिस्टंट रिसर्च सायंटीस्ट म्हणून देखील काम केल्याच पोलीस तपासात समोर आलं, तर अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत हा देखील बीएस्सीच शिक्षण घेत असून तो देखील एका कंपनीत नोकरीस आहे. एकंदरीतच 16 मे ते 26 मे या दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ही सगळी कारवाई करत एकूण 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर 25 किलो एमडी ड्रग्ज, 90 लाख रुपयांची जॅग्वार सह एक सफारी कार आणि इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 20 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना यश जरी आले असले तरी या प्रकरणी कच्चा माल पुरवठादार आणि या एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या इतर साथीदारांकडे पोलिसांच्या तपासाची आता चक्रे फिरणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'

Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास

अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ

Embed widget