मुंबई: एटीएसने पीएफआयशी संबंधित मौलाना इरफान खान नदवी याला आज विशेष न्यालायात हजर केले असता त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत, 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने रविवारी मालेगाव मधून अटक केली होती. दरम्यान 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
सप्टेंबर महिन्यांपासून देशभरात छापेमारी सुरु झाल्याने पीएफआय संघटना चर्चेत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातून अनेकांना एटीएसने ताब्यात घेतले होते. यांत्रिक काही संशयितांना न्यायालयात हजर केले असताना धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर नाशिकमधून पुन्हा एका पदाधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमूळे नाशिकमध्ये खोलवर रुसल्याचे दिसून येत आहे. इमाम कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना नदवी याला ताब्यात घेण्यात आला असून पुन्हा एकदा पीएफआयचे मालेगाव कनेक्शन अधोरेखित झाले आहे.
दरम्यान नदवी मालेगावमधील जामा मस्जिद इथे मौलावी म्हणून कार्यरत होता. पीएफआय संघटनेचा 2019 पासून सक्रिय सदस्य आहे मालेगावसाठी समन्वयकची भूमिका बजावत होता. ऑल इंडिया इमाम कौन्सिलचा पदाधिकारी होता. नुपूर शर्मा केस प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगाबाद, बीड, जालना नांदेड या जिल्ह्यात दंगे भडकविण्याचा त्याने प्रयत्न केला होता. चिथावणीखोर संभाषण करून तसेच रस्त्यावर उतरून आंदोलनाचा प्रयत्न ही केल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
शिवाय 'गुस्तखी की एक ही सजा सर तन से जुदा' असे संदेश सोशल मीडियावर पसरविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना व्यक्त करून सशस्त्र संघर्ष करण्याचा त्याचा मनसुबा होता. तसेच नाशिक एटीएसने दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपींशी जवळपास साडेसहाशे वेळा त्याने संपर्क साधला. नाशिक व्यतिरिक्त बीड, पुणे या ठिकाणी गुन्ह्यातील संशयितांशी साडेपाचशे हुन अधिक वेळा संपर्क साधल्याचे तपासात आढळून आले आहे.
दरम्यान, नदवीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून सांकेतिक भाषेत संभाषण केले जात असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. काही आक्षेपार्ह मेसेज, ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागले असून पुरावे न्यालायात दाखल केले आहेत. आतापर्यंत नशिकमध्ये झालेल्या कारवाईत हा सातवा संशयित पकडण्यात आला आहे.
14 दिवसांची कोठडी
मालेगाव येथून अटक केल्यानंतर नदवी यास विशेष न्यालायात हजर केले असता 28 नोव्हेंबर पर्यंत 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने रविवारी मालेगाव मधून अटक केली होती. दरम्यान 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.