एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हत्येचा बदला घ्यायला आले, मात्र जीव घेतला दुसऱ्याचाच!
नाशिक : नाशिकमध्ये दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय तुषार साबळे नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे नजरचुकीनं ही हत्या करण्यात आली. नाशिकच्या मंगलमूर्ती नगरमध्ये ही घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
तुषार हा मुळचा कसारा येथील असून सुट्टीनिमित्त मामाकड़े नाशिकला आला होता. गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मामा राहत असलेल्या हर्ष अपार्टमेंटच्या खाली बाकडयावर तो बसला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. नागरिकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल. होत मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पंचवटी भागात किरण निकम नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी चारचाकीतून आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं दुसऱ्याला मारण्याच्या नादात नजरचुकीनं चुकून तुषारचा बळी घेतला. सध्या या हत्येप्रकरणी चार जण अटकेत आहेत, तर पोलिसांनी अन्य आरोपींचा तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement