एक्स्प्लोर

हात नसूनही हतबल नाही, दयानंदचा क्रिकेट स्पर्धेवर ठसा

दयानंदला डाव्या कोपरापासून हात नाही. पण एका हातानंच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही करुन तो नाशिकची आंतरतालुका क्रिकेट स्पर्धा गाजवत आहे.

नाशिक : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरुअसलेल्या आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत सध्या एकच नाव गाजतंय, ते म्हणजे दयानंद जाधव याचं. खरं तर दयानंदला डाव्या कोपरापासून एक हात नाही. पण दोन्ही हातापायांनी सुदृढ असलेल्या खेळाडूंच्या साथीनं लेदरबॉल क्रिकेटचं मैदान गाजवण्यात तो कुठेही कमी पडताना दिसत नाही. लगान चित्रपटातलं कचरा नावाचं पात्र भारताचे महान स्पिनर भागवत चंद्रशेखर यांच्यावर बेतलं होतं. चंद्रशेखर यांनी लहानपणीच पोलियोग्रस्त झालेला आपला उजवा हात भविष्यात आपल्या कारकीर्दीचं बलस्थान बनवलं. लगान चित्रपटातला कचरा आणि भागवत चंद्रशेखर यांची आठवण होण्याचं कारण नाशिकचा दयानंद जाधव हा दिव्यांग क्रिकेटर. दयानंदला डाव्या कोपरापासून हात नाही. पण एका हातानंच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही करुन तो नाशिकची आंतरतालुका क्रिकेट स्पर्धा गाजवत आहे. दयानंद जाधव त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी या लहानशा गावचा क्रिकेटर आहे. आईवडील शेतमजुरी करतात. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी दयानंद फोटोग्राफीचा व्यवसायही करतो. लहानपणापासून त्याला एक हात नाही. पण दिव्यांग दयानंदनं नशिबाला बोल न लावता मेहनतीवर भर दिला. त्याच्या जिद्दीला अंजना स्पोर्टस क्लबचीही साथ लाभली. दोन्ही हातापायांनी सुदृढ असलेल्या खेळाडूंचं कसब दयानंद जाधवनंही आपल्या अंगी बाणलं आहे. तो एका हातानं चेंडू जितक्या लीलया वळवतो आणि तितक्याच सहजतेनं टोलवतोही. दिव्यांग खेळाडूंच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचं दयानंदचं स्वप्न आहे. त्यादृष्टीनं मेहनत करण्याची तयारीही आहे. पण त्याच्या मेहनतीला आपल्या मार्गदर्शनाचीही गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget