एक्स्प्लोर
चॉकलेट आणायला दुकानात गेलेल्या चिमुकलीने नाणं गिळलं
वैष्णवी माळी ही पाच वर्षांची मुलगी चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली होती, त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं उघड झालं

नाशिक : दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या चिमुरडीने दोन रुपयांचं नाणं गिळल्याची घटना नाशकात घडली होती. सुदैवाने घशात अडकलेलं नाणं बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. वैष्णवी माळी ही पाच वर्षांची मुलगी चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली होती. तिने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं दुकानदाराला सांगितलं, तेव्हा वैष्णवीने दोन रुपयांचं नाणं गिळल्याचा प्रकार उघडकीस आला. मनमाडमधील अवैद्यनगर भागात बुधवारी रात्री ही घटना घडली होती. वैष्णवीला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया करुन कॉईन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. वैष्णवीची प्रकृती सध्या स्थिर आहे. चिमुरड्यांनी नाणं गिळल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॉईन गिळल्याने सिन्नरच्या एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























