नाशिक : 47 कोटी रुपयांच्या नोटांची बदली प्रकरण नाशिक जिल्हा बँकेच्या गळ्याशी येण्याची शक्यता आहे. मुख्य शाखेनंतर ग्रामीण भागातल्या शाखांमध्येही आयकर विभागानं चौकशी सुरु केली आहे.

इतकंच नाही तर काही संचालकांचं वर्चस्व असलेल्या शाखा आणि कार्यालयांमध्येही चौकशी केल्याचं समोर येत आहे. केंद्र सरकारनं हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर 8 नोव्हेंबरच्या रात्री काही संचालकांनी दादागिरी करत बँकेते 47 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप आहे.

एकाच दिवसात बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये तब्बल 273 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्यामुळे हे व्यवहारसुद्धा संशयास्पद असू शकतात. त्यामुळे आयकर विभागानं चौकशीचा फास आणखी घट्ट केला आहे.