नाशिक : नाशिकमध्ये एका धावत्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील सर्व मुलं सुखरुप आहेत.


आज दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक रोडवर उड्डाणपूल चढत असताना शिवाजी पुतळ्याजवळ व्हॅनने पेट घेतला. या व्हॅनमध्ये 15-17 मुलं होती.

चालकाने तातडीने गाडी थांबवली. तसंच आजूबाजूच्या लोकांनी स्कूल व्हॅनकडे धाव घेत, मुलांना बाहेर काढलं. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवली.

मात्र या घटनेनंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परंतु स्कूल व्हॅनने पेट घेतल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.