नाशिक : नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी चार मोबाईलचोरांकडून तब्बल 105 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. नाशिक शहरात वाढलेल्या मोबाईलचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी पंचवटी भागातून चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं
ताब्यात घेतलेल्या चोरांची चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 6 लाख 26 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तब्बल 105 मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत. त्यामध्ये सॅमसंगच्याच 54 महागड्या मोबाईल्सचा समावेश असून अॅपल, ओप्पोसह इतर कंपन्यांचेही मोबाईल्स आहेत.
शहरातील भाजी बाजार, बस स्टॉप अशा गर्दीच्या ठिकाणांहून ही टोळी मोबाईल्स चोरत असे. हे एक मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.