नाशिक : काही दिवसांपूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशातच आज नाशिक शहरातील आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षल संजय मराठे असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे.


एकीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच खारघर घटनेनंतर आता एका अग्निविराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आला आहे. नाशिक शहरातील आर्टिलरी सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वरुळ गावातील हर्षल मराठे या 21 वर्षीय जवानाचा मृत्यू झाला आहे. हर्षल यांना शुक्रवारी दुपारी उलट्या आणि तापामुळे त्रास होत असल्याने आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.


दरम्यान सध्या नाशिकच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू आहे. हर्षल मराठे हा देखील लष्करी प्रशिक्षण घेत होता. अशातच त्यास काल उष्माघातामुळे उलटी व तापाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल केले. येथे डॉ. भरत शिंदे यांनी ठाकरे यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी ठाकरे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 


संपूर्ण गावावर शोककळा...


दरम्यान हर्षल ठाकरे यांच्या निधनामुळे संपूर्ण गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत शोककळा पसरली. कालपासूनच वरुळ गावात मराठे कुटुंबातील नातेसंबंधातील व अनेक समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज सकाळी 11 वाजता नाशिक हुन शहीद अग्नीवीर हर्षल यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी आपला मुलगा देशसेवेसाठी गेला असताना अचानक त्याचे पार्थिव पाहून आई ज्योतीबाई मराठे आणि भाऊ गौरव मराठे यांनी टाहो फोडला. काल रात्री उशिरा शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


ही बातमी वाचा: