Igatpuri Railway Mockdrill : सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांची वेळ. याचवेळी अचानक रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या दोन रेल्वे कोचला आग लागली. दोन्ही कोचमध्ये प्रवाशी अडकल्याने प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याचवेळी स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात इतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने प्रवाशांना देखील बाहेर काढत रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. तर हे होत रेल्वेचं मॉकड्रील.... 


दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वे मुंबई विभाग (Central Railway), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे संयुक्त मॉकड्रील करण्यात आले. या मॉकड्रिलमधून (Mock drill) मोठी दुर्घटना घडल्यास विविध विविध टीमसोबत सतर्कता आणि प्रतिसाद किती वेळेत मिळतो. याच पार्श्वभूमीवर नाशिक जवळील इगतपुरी (Igatpuri) अपयार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची (Artificial accident) परिस्थिती निर्माण करण्यात आली. एक डबा पेटवून दिला गेला आणि रुळावरून घसरवला. बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. सकाळी 11.27 वाजता ड्रिल सुरू करण्यात आली आणि लगेचच कोचला आग लागली. 11.28 वाजता मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षातील क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून संदेश देण्यात आला. 


अशी झाली प्रवाशांची सुटका 


दरम्यान यानंतर नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित झाले आणि राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF), रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला.  राष्ट्रीय आपात्कालीन प्रतिसाद दल (NDRF) 11.36 वाजता पोहोचले.  घटनास्थळी जाऊन तात्काळ नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी रेल्वे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिका 11.48 वाजता घटनास्थळी आणि अग्निशमन दल 11.35 वाजता पोहोचले.  रेल्वेच्या आरपीएफने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश करून आग पूर्णपणे विझवली. सर्व प्रवाशांना 12.40 वाजता बाहेर काढण्यात आले. 


इगतपुरीत झालं मॉकड्रील 


दरम्यान जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. सर्व स्टेकहोल्डर्स प्रतिसादात्मक आणि जलद असल्याचे आढळले आणि संपूर्ण परिस्थिती 1 तासात नियंत्रित करण्यात आली. या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले आणि वास्तविक जीवनात अशा प्रात्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात मदत होईल. मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघात आणि अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित प्रतिसाद देण्याचे आहे. अपघाताची पूर्वतयारी आणि जलद प्रतिसाद यासाठी या कवायती रेल्वेद्वारे संयुक्तपणे केल्या जातील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने या कवायतीचे संयोजन केले.