Nashik Accident News : सुरगाणा जवळ बोरगाव सापुतारा मार्गावर वणीकडून सापुताराकडे जाणारी लक्झरी (RJ 27 PB 2658) बोरगावकडून नाशिककडे (Nashik) जाणारी महिंद्रा पिकप (MH 41 AU 2192) यांच्यात समोरासमोर धडक धडक झाली. अपघात इतका भीषण होता की यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. कैलास पांडुरंग दळवी (रा. ततानी कळवण), पंढरीनाथ मुरलीधर  (शिंगारवाडी, कळवण), नारायण देवराम पवार (रा. घागरबुडा, सुरगाणा) हे तीन जण जागीच ठार झाले. तर भास्कर पांडुरंग राऊत, सुनील पुंडलिक बागुल, किशोर साबळे, सावळीराम बबन साबळे, यशवंत महादू गायकवाड, यशवंत सोमा राऊत अशी जखमींची नावे आहेत. 


दरम्यान हे कळवण तालुक्यातील शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी चालले होते. तर काही प्रवाशी निघालेली लक्झरी बस यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तातडीने घटनेची माहिती रुग्णवाहिकेला त्यांनतर पोलीस स्टेशन ला दिली. अपघातानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.




सदर जखमींना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, संतोष गवळी, पराग गोतरणे, करीत आहेत.


जमावाकडून लक्झरी बसची तोडफोड


अपघातानंतर संतप्त शेतकऱ्यांनी लक्झरीच्या काचा फोडून तोडफोड केली. अपघातस्थळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त शेतकरी कळवण तालुक्यातील राहिवाशी आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :