एक्स्प्लोर
ICU मधले एसी 15 दिवसांपासून बंद, रुग्णांना पुठ्ठ्याने वारा
त्यामुळे अॅडमिट असलेले रुग्ण एकतर स्वखर्चाने पंखे आणत आहेत. नाहीतर आहे त्या अवस्थेत उपचार घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही.
नाशिक : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या आयसीयूमधील स्थिती ऐकली तरी अंगावर काटा येईल. कारण मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.
त्यामुळे अॅडमिट असलेले रुग्ण एकतर स्वखर्चाने पंखे आणत आहेत. नाहीतर आहे त्या अवस्थेत उपचार घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही.
गंभीर बाब म्हणजे आयसीयूमधल्या उपकरणांसाठी ठराविक तापमानाची गरज असते. मात्र सगळे नियम धाब्यावर बसवत बंद पडलेल्या एसीतच रुग्णांना उपचार देणं सुरु आहे.
खरंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या हॉस्पिटलचं कंत्राट आहे. परंतु सध्या कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. या हॉस्पिटलची लिफ्ट बंद आहे. त्यामुळे एमरजन्सीमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला नातेवाईक आणि कर्मचारी झोळी करुन संबंधित वॉर्डमध्ये नेतात.
उपचारांसाठी मुंबई, पुण्याला जाण्याऐवजी नाशिकमध्येच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं. धुळे, नंदूरबार, मालेगावमधील रुग्ण इथे उपचारांसाठी येतात. परंतु आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचीच ही अवस्था असेल तर रुग्णांनी कुठे जायचं हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement