एक्स्प्लोर
तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मालेगावात मुस्लिम महिलांचा मोर्चा
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांनी हा मोर्चा काढला होता.

मालेगाव : तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांनी हा मोर्चा काढला होता. केंद्र सरकारकडून शरिया कायद्यात होत असलेल्या हस्तक्षेपाला आंदोलक महिलांनी तीव्र विरोध दर्शवला. शिवाय, तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक सरकारने तात्काळ मागे घ्यावे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ए.टी.टी. हायस्कूल येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला होता. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. इस्लाम धर्मात स्त्री ही कुटुंबाच प्रतिनिधित्व करते, त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ईस्लामी कायद्यात सरकार ढवळाढवळ करत आहे. ही ढवळाढवळ सहन केली जाणार नाही, असं मत यावेळी मुस्लीम महिलांनी व्यक्त केलं. दरम्यान, तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून, राज्यसभेत मात्र हे विधेयक प्रलंबित आहे. या विधेयकाला एमआयएमने सुरुवातीपासून तीव्र विरोध दर्शवला आहे. तर आता काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























