एक्स्प्लोर

महिन्याला 44 हजारांचा व्यवसाय, मुद्रा योजना लाभार्थ्याची यशोगाथा

हरी ठाकूर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील एक सलून व्यवसायिक आहेत. माँ दुर्गा नावाचं त्यांचं मेन्स पार्लर आहे.

नाशिक : मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात महाराष्ट्रातील नाशिकचे सलून व्यवसायिक हरी ठाकूर यांच्याशी मोदींनी बातचीत केली. हरी ठाकूर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील एक सलून व्यवसायिक आहेत. माँ दुर्गा नावाचं त्यांचं मेन्स पार्लर आहे. 30 वर्षांपूर्वी ठाकूर आपल्या परिवारासह उत्तर प्रदेशहून नाशिकमध्ये आले. कॅम्प परिसरात त्यांनी एक छोटी टपरी टाकून सलून व्यवसायाला सुरुवात केली. मात्र त्यातून कुटुंब चालवणं कठीण जात असल्याने त्यांनी एक दुकान टाकून व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या देवळाली कॅम्प शाखेत जाऊन मोदी सरकारच्या मुद्रा लोन बाबत त्यांनी जाणून घेतलं. बँकेनेही त्यांची आर्थिक परिस्थिती पडताळत मुद्राच्या शिशू, किशोर आणि तरुण या तीन प्रकारातून किशोरच्या प्रकारात बसवत ठाकूर यांच्या मागणीनुसार चार लाख रुपयांचं कर्ज त्यांना मंजूर केलं. यामुळे व्यवसायात त्यांना मोठी मदत झाली. भविष्यात अजून व्यवसाय वाढवणार असल्याचं ते सांगतात. महिन्याला 44 हजार रुपयांचा व्यवसाय हरी ठाकूर यांना 15 डिसेंबर 2017 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रने मुद्रा लोन मंजूर केलं. त्याच जोरावर त्यांच्या व्यवसायात भर पडली. सुरुवातीला महिना 25 हजार रुपये कमवणारे हरी ठाकूर आज महिना 44 हजार रुपये कमवत आहेत. विशेष म्हणजे डोक्यावर कर्जाचा बोजा जास्त दिवस राहू नये म्हणून पुढील 10 महिन्यांचे हफ्ते त्यांनी आधीच भरुन टाकले आहेतत. हिच गोष्ट त्यांना मोदींपर्यंत घेऊन गेल्याचं बँक मॅनेजर सांगतात. मोदींचा मराठीतून संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आपल्याशी बोलणार आहेत या गोष्टीवर ठाकूर यांचा खरं तर पहिले विश्वास बसत नव्हता. मात्र आज सकाळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांसह जाऊन ते पोहोचले आणि मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी मराठीतून ‘काय म्हणताय ठाकूर’ असं म्हणत बोलायला सुरुवात केली. केंद्रात भाजपचं सरकार येताच त्यांनी आवास योजना, मुद्रासह अनेक योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळेच हरी ठाकूर यांच्यासारख्या छोट्या व्यवसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget