एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये मिनी बसला आग, सुदैवाने 10 जण बचावले!
नाशिक : नाशिकमधील वर्दळीचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.
मिनी बसमधील प्रवासी अहमदाबादचे सोनी नामक कुटुंब असून शनिशिंगनापूरला दर्शन घेऊन ते त्र्यंबकेश्वरला जात असताना नाशिकमध्ये येताच द्वारका परिसरात अचानक गाडीतून धूर निघू लागला. हे बघताच चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली आणि गाडीतिल 5 महिलांसह 2 पुरुष आणि 3 लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement