नाशिक: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणाऱ्या मनोज जरांग पाटील (Manoj Jarange) नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्रंबकेश्वरचे दर्शन (Trimbakeshwar Temple) घेतले. त्रंबकेश्वरमध्ये जाताच पुरोहित संघाच्या (Nashik Purohit Sangh) माध्यमातून त्यांना जणू खजिनाच हाती लागला.  हा खजिना आहे नामावली रूपाने पुरोहित संघाने जतन करून ठेवलेल्या नोंदीचा. या नोंदीची दखल आता प्रशासनाने घेतली असून नोंदी मागून घेतल्या आहेत. 


देशभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी येतात, इथे आल्यावर पुरोहितांकडून पूजापाठ केली जाते. त्यावेळी पुरोहित आलेल्या भाविकांच्या नोंदी करून ठेवतात. अशा हजारो नामावलीत विविध जाती धर्माच्या हजारो नोंदी आजही उपलब्ध आहेत. त्यात काही मराठा, कुणबी नोंदी देखील आहेत. याची पडताळणी प्रशासनाच्या वतीनं देखील केली जात आहे. 


वर्णमाला नुसार प्रत्येक जातीनुसार जिल्हा, तालुका आणि गावानुसार नोंदी आजही उपलब्ध आहेत. त्रंबकेश्वर देवस्थानच्या वीस ते पंचवीस खोल्यांमध्ये आणि पुरोहितांच्या घरांमध्ये नामावली उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज काळातीलही काही नोंदी आहेत.


नामावलीचे गठेच्या गठ्ठे उपलब्ध आहेत. पिढ्यान् पिढ्या हा दस्तऐवज पुरोहितांनी जिवापाड जतन करून ठेवला आहे. त्यांची पानं आता जीर्ण झालेत, यातून अनेक मराठा कुणबी समाजाच्या नोंदी शोधल्या जात आहे.  हा अनमोल खजिना आज मराठा  आरक्षणाचा लढाईत महत्वाचा धागा ठरणार आहे.


जुन्या मंदिरातील नोंदी तपासा (Manoj Jarange On Maratha Reservation)


मराठ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले, आरक्षणचा संघर्ष योध्या अशी उपाधी लाभलेले मनोज जरांगे पाटील यांनी बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरचे घेतले. दर्शनानंतर जरांगे पाटलांनी त्रंबकेश्वरच्या पुरोहितांची भेट घेतली. या भेटीत पुरोहित संघाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या हाती मोठा खजिनाच  लागला.  हा खजिना आहे नामावली रूपाने पुरोहित संघाने जतन करून ठेवलेल्या नोंदीचा.  छत्रपती शिवाजी महाराज काळातील ही काही नोंदी आहेत.


त्र्यंबकेश्वरमध्ये सापडलेल्या नोंदीनंतर आता राज्यभरातील मंदिरांमधील जुन्या नोंदी तपासण्यात याव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्रंबकेश्वर प्रमाणेच नाशिकच्या पुरोहितांकडेही अशाच प्रकारच्या नामावली सांभाळून ठेवल्या आहेत. त्या नोदीची माहिती ही प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. 


ही बातमी वाचा: