Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रमुख शहर म्हणून मालेगावची (Malegaon) ओळख आहे. याच शहराला आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 'मिनी पाकिस्तान' म्हणून संबोधलं आहे. याच संदर्भात माजी आमदार आसिफ शेख (Aasif Sheikh) यांनी आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. 300 कोटींची वीज चोरी प्रकरणी प्रसार माध्यमात आ. नितेश राणे यांनी हा पैसा 'लव्ह जिहाद आणि लँड जिहाद' साठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, मालेगावचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करत बदनामी करणारे वाक्य प्रसार माध्यमात वापरल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत असं माजी आमदार आसिफ शेख म्हणाले. तसेच, आमदार नितेश राणे यांनी मालेगावकरांच्य भावना दुखावल्या बद्दल मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी अशी नोटीसीच्या माध्यमातून मागणी केली आहे. तसेच, जर आ. नितेश राणे यांनी माफी मागितली नाही तर मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचा माजी आमदार आसिफ शेख यांनी इशारा दिला आहे.
बदनामी करणारे वाक्य करून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप
मालेगावात प्रत्येक सण समारंभाच्या वेळेला हिंदू-मुस्लिम एकोपा पाहायला मिळतो. मात्र, याच मालेगावात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बदनामी करणारे वाक्य करून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. ॲड. ए. ए. खान यांच्या माध्यमातून आसिफ शेख (Asif Sheikh) यांनी आ. नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीला आमदार नितेश राणे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आसिफ शेख नक्की काय म्हणाले?
300 कोटींची वीज चोरी प्रकरणी प्रसार माध्यमात आ. नितेश राणे यांनी हा पैसा 'लव्ह जिहाद आणि लँड जिहाद' साठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता. याच संदर्भात आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' असा केला आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून भावना दुखावल्या बद्दल माजी आमदार आसिफ शेख यांनी आ. नितेश राणे यांना मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी असं म्हणत नोटीस पाठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :