एक्स्प्लोर

माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्की बदली करा : तुकाराम मुंढे

''माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,'' असं ते म्हणाले. शिवाय वारंवार बदली केली जाते याचं नक्कीच वाईट वाटतं, पण निर्णय शासनाचा असतो, असंही ते म्हणाले.

नाशिक : कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणत आहे. मात्र भाजपच्या या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंढेंनी पाठिंब्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ''माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,'' असं ते म्हणाले. शिवाय वारंवार बदली केली जाते याचं नक्कीच वाईट वाटतं, पण निर्णय शासनाचा असतो, असंही ते म्हणाले. ''आरोप बिनबुडाचे'' ''अविश्वास ठरावावर निर्णय शासनाचा असतो, पण माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. करवाढीबाबत चुकीचा संभ्रम तयार केला जातोय. 40 पैसे जी करवाढ मी केली होती ती पाच पैशांवर आणली आहे.  करवाढीचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केलं जातंय,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. ''... म्हणून रस्त्याची कामं थांबवली '' ''मी येताच ऑडिट केलं, तर शहरात जवळपास दोन लाख प्रॉपर्टी अनाधिकृत सापडल्या. 257 कोटीची रस्त्यांची कामं थांबवली आहेत. कारण, ही कामं रस्ते दुरुस्तीची आहेत. कुंभमेळ्याच्या काळात चुकीच्या पद्धतीने केलेली ही कामं आहेत. एकीकडे नाशिक महापालिकेत ज्या 22 ते 23 गावांचा समावेश केला, त्या गावांमध्ये मातीचे रस्ते आहेत आणि दुसरीकडे नव्याने केलेल्या शहरातील रस्त्यांवरच पुन्हा कोट्यवधींचा खर्च कशामुळे,'' असा सवालही तुकाराम मुंढे यांनी केला. ''नगरसेवक निधीतला एक रुपयाही खर्च होत नाही'' ''नगरसेवक निधी 75 लाख होता, तो कायद्यानुसार कमी केला. बजेटच्या दोन टक्के नगरसेवक निधी असतो, तेवढाच ठेवलाय. अगोदरच्या काळात पाहिलं तर नगरसेवक निधीतला एक रुपयाही खर्च झालेला नाही. अयोग्य आणि कायद्याच्या बाहेरील गोष्ट तुम्ही माझ्याकडून अपेक्षित करत असाल तर ते होणार नाही आणि हे चुकीचं आहे का ते अविश्वास आणणाऱ्यांनाच विचारावं,'' असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''माझं काम नाशिकच्या विकासासाठी चाललं आहे. त्यासाठी मला योग्य वेळ आणि निधी अपेक्षित आहे. करवाढीतून निधी जमवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेळ ही बदलीवर अवलंबून आहे, पण माझी बदली करुन प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करा,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या : स्पेशल रिपोर्ट : हे फक्त तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच का? तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नाशिककर एकवटले नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Embed widget