एक्स्प्लोर

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी उद्या निवडणूक

यावर्षी कोकण पदवीधर निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण, गद्दाराला धडा शिकवा या त्वेषाने राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. यावर्षी कोकण पदवीधर निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण, गद्दाराला धडा शिकवा या त्वेषाने राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्याने भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली आहे. कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार भाजप : निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला शिवसेना : संजय मोरे एकूण मतदार : एक लाख चार हजार ठाणे : 45 हजार पालघर : 16 हजार सिंधुदुर्ग : 5308 रत्नागिरी : 16 हजार रायगड : 19 हजार गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीमुळे भाजपच्या उमेदवाराला पाडून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे निवडून आले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप दोन्ही उमेदवार रिंगणात आहे. निरंजन डावखरे बाहेरुन पक्षात आल्यावर मिळालेल्या उमेदवारीमुळे भाजप पक्षात नाराजी आहे. राष्ट्रवादीला तयारीला वेळ मिळाला नाही. तरी कोकण पदवीधरमध्ये गद्दाराला धडा शिकवायचा या भावनेने राष्ट्रवादी उतरली आहे. त्यामुळे निरंजन डावखरेंसमोर आव्हान आहे. भाजपचा उमेदवार येऊ द्यायचा नाही यासाठी कोणती समीकरणं जुळतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन क्रमांकाची पसंतीची मतं कुणाला मिळणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्रीही सर्वश्रूत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक कोकणसोबतच मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही उद्या होत आहे. यावर्षी शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाने ताकद पणाला लावल्यामुळे या निवडणुकाही चुरशीच्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सर्वच मंत्र्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार भाजप : अॅड. अमितकुमार मेहता शिवसेना : विलास पोतनीस लोकभारती : जालिंदर सरोदे अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर अपक्ष : डॉ. दीपक पवार एकूण मतदार : 70 हजार मुंबई उपनगर : 52 हजार मतदार शहर : 18 हजार मतदार गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत याच मतदारसंघातून 13 हजार मतांनी निवडून आले होते. दीपक सावंत हे युतीचे मतदार होते. पण यावेळी शिवसेना आणि भाजप दोघांनी आपले स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. आधी आदित्य ठाकरे यांनी तरुण उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती आणि ज्येष्ठ शिवसैनिक विलास पोतनीस यांना नंतर संधी दिली. यावरुन नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाने टीका केली. मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ताकद लावत आहेत. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता. मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार शिवसेना : शिवाजी शेंडगे लोकभारती : कपिल पाटील अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख एकूण मतदार : 10 हजार 169 मुंबई उपनगर : 8273 मुंबई शहर : 1896 विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. पण याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. शिवाय नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीही उद्याच निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निकाल 28 जूनला जाहीर होईल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Embed widget