एक्स्प्लोर

खडसेंची नाशिकमधील एसीबीच्या कार्यालयात हजेरी

एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता.

नाशिक : भ्रष्टाचाराचे एका मागोमाग एक आरोप आणि चौकशांमुळे बेजार झालेले भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकमधल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. गोपनीय तक्रारीच्या चौकशीचा भाग म्हणुन खडसेंना बोलावण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. खडसेंवर पुणे, जळगाव सह अनेक ठिकाणच्या भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं केले गेले आहेत. यातल्या एखाद्या चौकशीसाठी खडसेंना बोलावण्यात आल्याचं बोललं जातं आहे. सायंकाळी पाच वाजता खडसे लाचलुचपत विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी चित्रीकरणासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींजवळही खडसेंनी आपली नाराजी उपरोधिक शब्दांत व्यक्त केली. माझे मोठे आणि चांगले फोटो घ्या असं सांगत खडसे माध्यमांशी न बोलताच निघून गेले. खडसेंच्या या गोपनीय चौकशीचं कारण नेमकं काय यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. सत्तापद गेल की पक्ष कार्यकर्ते नेते कशी पाठ फिरवतात हे यावेळी पाहायला मिळालं. कधीकाळी खडसे नाशिकमध्ये आले तर त्यांच्या मागेपुढे फिरणारा एकही नाशिकमधला नेता, कार्य़कर्ता यावेळी खडसेंसोबत नव्हता हे विशेष. खडसेंसोबत दिसलो तर पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची नाराजी नको यामुळे अनेकांनी खडसेंना पाठ दाखवल्याचं बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Embed widget